भारत - फ्रान्स संबंध : मैत्रीचे नवे पर्व
दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना 'विशेष जागतिक सामरिक भागीदारी' (Special Strategic Partnership) असा दर्जा दिला आहे.
एअरबस हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन
- कर्नाटक राज्यातील वेमगल येथे देशातील पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारली जात आहे.
- याचे उद्घाटन मुंबईतून करण्यात आले.
- येथे H-125 लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरचे उत्पादन केले जाईल.
क्षेत्रनिहाय करार आणि उपक्रम
| क्षेत्र |
प्रमुख मुद्दे |
| संरक्षण (Defense) |
'हॅमर' क्षेपणास्त्रांच्या भारतातील उत्पादनासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रेंच कंपनी सॅफ्रान यांच्यात करार. |
| तंत्रज्ञान (Technology) |
२०२६ हे वर्ष 'इंडिया - फ्रान्स इयर ऑफ इनव्हेशन' म्हणून घोषित. |
| शिक्षण आणि आरोग्य |
'इंडो - फ्रेंच सेंटर फॉर एअर इन हेल्थ' ची स्थापना आणि आरोग्य क्षेत्रातील संशोधनावर भर. |
| भविष्यवेधी योजना |
दोन्ही देशांनी 'होरायझन २०४७' रोडमॅप जाहीर केला आहे. |
महत्त्वाच्या ठळक बाबी
- लष्करी सहकार्य: भारतीय लष्कर आणि फ्रेंच लँड फोर्सेसमध्ये अधिकाऱ्यांच्या परस्पर नियुक्तीचा ऐतिहासिक करार.
- पुणे केंद्र: भारतीय वायुदल आणि नौदलासाठी उत्पादन व देखभाल कार्यासाठी पुण्यात 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन केले जाणार.
- आर्थिक सुधारणा: दुहेरी कर टाळण्यासाठीच्या (Double Taxation) करारातील सुधारित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या.
पंतप्रधान मोदींचे विधान:
"जग सध्या अनिश्चिततेच्या काळातून जात आहे... आमची भागीदारी महासागराच्या तळापासून ते सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचू शकते."